भारत (India) हा कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे. या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. तसेच अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालन (Animal husbandry) करतात. दूध उत्पादन क्रमांकात देश पहिल्या स्थानी आहे. यावर्षी दुधाला चांगले दर दिल्याने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु उत्पादनाबाबत निष्काळजीपणा केला की तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो. तुम्ही जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही स्वच्छ आणि निर्भळ दूध उत्पादन घेऊ शकता.
लग्नातच ऐनवेळी घडलं असं काही की, नववधूच्या पायाखालची जमीनच सरकली
दूध काढण्यापूर्वी जनावरांच्या गोठ्यात मधुर संगीत लावा. तसेच गाई (Cow) किंवा म्हशींचे दूध काढण्यापूर्वी त्यांना धुवा. त्यांची कास कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्त दूध देत असणाऱ्या गाईंच्या दिवसातून किमान तीन वेळा धारा काढा. दररोज दुधाचा रंग, वास आणि चव घेऊन पाहावी. जर शंका वाटली तर ते दूध वेगळे ठेवा.
पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना बसणार मुसळधार पावसाचा तडाखा, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
जर तुम्ही मिल्किंग मशीन (Milking machine) ने धार काढली तर सडांना कोणतीही इजा होत नाही. तसेच सडांचा आकार वाढत नाही. दूध काढल्यानंतर कासेतील सर्व दूध निघाले आहे की नाही याची खात्री करून गाई-म्हशींचे सड न चुकता दररोज जंतुनाशक द्रावणात बुडवा.
मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांचा जवळचा आणि विश्वासू पदाधिकारी शिंदे गटात जाणार? चर्चांना उधाण
हे ही पाहा –