
Pune Crime । पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे (Crime in Pune) प्रमाण वाढले आहे. गुन्ह्यांसंबंधी कायदे कडक करूनही गुन्हे (Crime) कमी झाले नाही. दररोज कुठे ना कुठे गुन्हे घडत असतात. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे. जाणून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (Latest marathi news)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने आपल्या पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा (Satara) जिल्ह्यातील मांढरदेवीत परिसरात नेले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिला थेट २५० फूट खोल दरीत फेकून दिले. इतकेच नाही तर त्याने हत्या केल्यानंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा कट रचला. आरोपीने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पत्नी बेपत्ता झाल्याची लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) दिली होती.
Mumbai Fire Video । ब्रेकिंग न्यूज! शाळेला भीषण आग; सगळीकडे धावपळ सुरु
तक्रारीनुसार पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, पोलिसांना पतीवर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या कुटुंबीयांच्या दबाबामुळे वयाने मोठी असणाऱ्या मुलीशी त्याने विवाह केला होता. दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर असल्याने सतत त्यांचे वाद होत होते. त्याने पत्नीला सोडचिठ्ठी देण्यास सांगितले. पण तिने सोडचिठ्ठी देण्यास नकार दिल्याने तो चिडला होता. अखेर रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली.
Veena Malik । ‘या’ क्रिकेटरकडून प्रसिद्ध अभिनेत्री करुन घ्यायची मसाज; वाचून तुम्हीही व्हाल थक्क