एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असू शकते? काय सांगतो कायदा जाणून घ्या

How much land can be held in one person's name? Know what the law says

सतत जमिनीच्या (Land) मुद्द्यावरून वाद होत होतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. इतकेच नाही तर याच मुद्द्यावरून संपूर्ण राज्यभरात लाखो खटले प्रलंबित आहेत. अनेकवेळा असे होते की, जमीन कसणारा एक व्यक्ती असतो परंतु प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच असतो. जमिनीची खरेदी विक्री करत असताना फसवणुकीच्या (Land Fraud) प्रमाणात देखील वाढ झाली आहे. अनेकांना असा प्रश्न पडतो की एका व्यक्तीच्या नावावर किती असावी. जाणून घेऊयात याचे उत्तर. (Latest Marathi News)

Wheat Variety । शास्त्रज्ञांनी तयार केले गव्हाचे 3 वाण, 150 दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन

विविध राज्यातील कायदे

जमिन खरेदीसाठीचे विविध राज्यात वेगवेगळे नियम (Purchase of land rules) आहेत. महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदीची कमाल मर्यादा ५४ एकर आहे. कर्नाटकमध्येही असाच नियम आहे. केरळमध्ये जमीन दुरुस्ती कायदा १९६३ अंतर्गत, विवाहित नसणाऱ्या व्यक्तीला फक्त ७.५ एकरपर्यंत तर ५ सदस्यांच्या कुटुंबाला १५ एकर जमीन खरेदी करता येते. हिमाचल प्रदेशामध्ये ३२ एकर जमीनीची खरेदी करता येते.

Talathi Bharti । तलाठी भरतीच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ! परीक्षेच्या सर्व्हरमध्ये बिघाड

पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त २४.५ एकर, उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीला जास्तीत जास्त १२.५ एकर लागवडीयोग्य जमीन खरेदी करता येते. गुजरातमध्ये शेती करणाऱ्याला जमीन खरेदी करता येते. तसेच बिहारमध्ये १५ एकरपर्यंत शेती किंवा बिगरशेती खरेदी करता येते.

Viral Video । धबधब्याखाली आंघोळ करणे बेतले जीवावर, अंगावर पडला ढिगारा; पहा धक्कादायक व्हिडिओ

देशातील कायदा

त्याशिवाय अनिवासी भारतीय किंवा परदेशी नागरिकाला भारतात शेतीयोग्य जमीनीची खरेदी करण्याचा अधिकार नाही. इतकंच नाही तर त्या नागरिकांना फार्म हाऊस किंवा वृक्षारोपण मालमत्ताही खरेदी करण्याचा अधिकार नाही. परंतु त्यांना कोणाला वारसा हक्काने जमीन द्यायची असल्यास त्यांना तो अधिकार आहे.

Politics News | “प्रत्यक्षात मात्र हा माणूस अत्यंत कृतघ्न निघाला”, दिलीप वळसे-पाटलांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचे खरमरीत उत्तर

Spread the love