Politics News | “प्रत्यक्षात मात्र हा माणूस अत्यंत कृतघ्न निघाला”, दिलीप वळसे-पाटलांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचे खरमरीत उत्तर

"Actually, this man turned out to be very ungrateful", Jitendra Awad's scathing reply to Dilip Valse-Patal's criticism

Politics News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अनेक आमदारांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाची साथ सोडली. विश्वासू आणि जवळचे सहकारी अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये गेल्याने शरद पवारांना खूप मोठा धक्का बसला आहे. परंतु शरद पवारांनी खचून न जाता पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षफुटीनंतर या दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. (Latest Marathi News)

Weather Update । पुन्हा पावसाचे थैमान! हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा

“आपल्याकडे शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग नेते असताना त्यांना जनतेने एकदाही बहुमत देऊन मुख्यमंत्री केले नाही. आपले केवळ ६० ते ७० आमदार निवडून येतात”, अशी टीका राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) रविवारी एका कार्यक्रमात केली. त्यावरून आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

तुमच्या गावात कोणी जमीन खरेदी केली आणि कोणी विकली? एका मिनिटात समजणार, जाणून घ्या कसं ते?

“सर्वात विश्वासू साथीदार आणि साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. वळसे-पाटलांची झालेली नैतिक अधोगती पाहून मला खूप वाईट वाटले. पवारांना या माणसातील हा गुण कसा समजला नाही. त्यांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे,” असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

Bus Accident । भाविकांवर काळाचा घाला! 50 फूट खोल दरीत बस कोसळून 7 भाविकांचा जागीच मृत्यू

Spread the love