Banana with Milk । दूध आणि केळीचे एकत्रित सेवन आरोग्यासाठी कितपत फायद्याचे आहे? वाचा

How beneficial is the combined consumption of milk and banana for health? Read on

Banana with Milk । बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला फळे (Fruits) खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये केळीत जास्त प्रमाणात जीवनसत्त्व आणि पोषक तत्त्वे आढळतात. शिवाय नियमित केळीचे (Banana) सेवन केले तर अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. तर दुधापासून (Milk) शरीराला कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ड मिळते. परंतु अनेकजण हे दोन्ही पदार्थ एकत्र खातात. (Latest Marathi News)

Lumpy Disease । सरकारकडून पशुधनासाठी 170 कोटींचा खर्च, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

खरंतर अनेकजण दुध आणि केळीच्या काॅम्बिनेशनला (Combination of milk and banana) आदर्श मानतात. कारण दूधात नसलेले पोषकतत्त्वे केळीमध्ये असतात आणि केळीत नसलेले पोषकतत्त्वे दुधामध्ये आढळतात. दूध -केळी एकत्र करुन शेक बनवता येतो. परंतु आरोग्याच्या दृष्टीने हे कितपत फायद्याचे आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का.जाणून घेऊयात याचे उत्तर.

Loan EMI । ग्राहकांना ‘या’ बँकांचा मोठा झटका! EMI च्या हप्त्यात केली वाढ

दूध आणि केळी खाण्याचे फायदे

जर तुमचे वजन कमी असेल तर तुम्ही रात्री केळी आणि दुधाचे एकत्र सेवन करू शकता. यामुळे वजन वाढतेच त्याशिवाय गॅस, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीपासून सुटका होते. पचनशक्तीही मजबूत होते. परंतु ज्या व्यक्तींना पचनाची समस्या असेल त्यांनी केळी आणि दुधाचे एकत्र सेवन करू नये. (Benefits of eating milk and bananas)

Success Story । सरकारी नोकरीला रामराम ठोकत पठ्ठ्यानं केली कोरफडीची शेती, आता करतोय कोट्यवधी रुपयांची उलाढाल

दूध आणि केळी खाण्याचे तोटे

जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असेल तर केळी आणि दुधाचे चुकूनही एकत्र सेवन करू नये. तसेच उशिरा रात्री केळी आणि दुधाचे सेवन केले तर तुम्हाला खोकला किंवा सर्दीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी दूध आणि केळी एकत्र खाऊ नये. (Disadvantages of eating milk and bananas)

Gadar 2 Box Office Collection । आत्तापर्यंत गदर २ चित्रपटाने केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Spread the love