
आपण नेहमी पाहतो किंवा नेहमी अनुभवत असतो की, वाहन चालवत असताना अनेकदा चालकाच्या ड्रायव्हिंग (Driving) कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जातात. मग यामध्ये विशेषकरून महिलांना (Womens Driving) चुकीच्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं. त्यामुळे प्रसाशनाकडून वारंवार बजावूनही शिस्तीचं, वाहतुकीच्या नियमांचं (Traffic rules) पालन केलं जात नाही. इतकंच नाही तर हे वाहन चालवणे कधी कधी जीवावरही बेतू शकतं. दरम्यान सोशल मीडियावर (Social media) अलिकडे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
केबीसीच्या मंचावर बच्चनसाहेबांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, “लग्नानंतर मी देखील…”
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला दोन्ही पाय खाली ठेवून स्कूटी चालवत होती, रास्ता पूर्ण रिकामा असून ट्रॅफिक देखील नव्हतं. महिला गाडी चालवत असताना ती एका चौकात पोहोचते, तिथून एक कारचालक आपली गाडी काढत असतो आणि ती महिला सरळ जाऊन त्याच्या गाडीला धडकते.
आता ‘मागेल त्याला शेततळे मिळणार’; राज्य सरकारची मोठी घोषणा
आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर psycho_biihari अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकरी गमतीशीर प्रतिक्रिया देखील देत आहेत.
शेतकऱ्यांनी घेतली थेट जलसमाधी; नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन