मागच्या दोन तीन दिवसापूर्वी एमपीएससी (MPSC) टॉपर दर्शना पवार हीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला होता. यानंतर तिचा खून झाला असल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले. यानंतर या हत्या प्रकरणी तिचा मित्र राहुल हांडोरेला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केलं आहे. दर्शनाची हत्या झाल्याच्या दिवसापासून राहुल गायब होता. अखेर आज त्याला पोलिसांनी पकडले आहे.
धक्कादायक! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यास रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण; व्हिडीओ व्हायरल
या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी राहुलला अटक केली आहे. राहुलसोबत लग्न करण्यास दर्शनाने नकार दिला त्यामुळे संतापलेल्या राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ब्रेकिंग! बस आणि मिक्सर ट्रकचा भीषण अपघात; एकजण जागीच ठार
दर्शना पवार आणि राहुल दोघे नातेवाईक होते. राहुलला आधीपासूनच दर्शनाशी लग्न करण्याची इच्छा होती. ते एकत्र एमपीएससीचा अभ्यास देखील करत होते. मात्र दर्शना आणि तिच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते त्यांचा या लग्नाला नकार होता. त्याचबरोबर दर्शनाचे दुसऱ्या मुलासोबत लग्न देखील ठरले होते. त्यामुळे राहुलला मोठा संताप झाला होता. यामुळे त्याने दर्शनाला शेवटचे बोलायचे म्हणून राजगडवर नेले आणि तिथेच तिचा खून केला. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Maharashtra Rain Update । महाराष्ट्रात कधी पडणार पाऊस? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट