
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) हे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत शरद पवारांना लोक मानतात. त्यांच्या राजकीय भूमिकांची चर्चा कायम होत असते. सध्या एका फोटोमुळे शरद पवार चर्चेत आले आहेत. हा फोटो त्यांची कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे.
राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? वाचा एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ( Supriya Sule) कायम शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. सोशल मीडियावर त्या कायम ऍक्टिव्ह असतात. यावर त्यांनी अनेकदा आपल्या वडिलांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. नुकताच त्यांनी आपल्या वडिलांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये शरद पवार आपल्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासोबत आहेत.
हा ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील फोटो जवळपास 40 ते 50 वर्षे जुना आहे. या फोटोला सुप्रिया सुळेंनी ‘नॉस्टॅल्जिया’ असे कॅप्शन टाकले आहे. या फोटोमध्ये असणारी शरद पवारांची फ्रेंच कट दाढी हा राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरला आहे.
बायकोचे दागिने गहाण ठेऊन लोकांना फुकट हेल्मेट वाटतोय ‘हा’ माणूस; मित्राचा अपघात झाला म्हणून…
आताच्या राजकारणात शरद पवारांना तरुणपणी पाहिलेले फार थोडे लोक आहेत. राजकारणातील बहुतेक लोकांनी शरद पवारांना त्यांच्या सध्याच्या लुकमध्येच पाहिलं आहे. यामुळे फ्रेंच कट दाढी राखलेल्या शरद पवारांचा चर्चेत आलेला फोटो हा दुर्मिळच म्हणावा लागेल.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; मोदींवर टीका करणे पडले महागात