मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलगा पहिल्यांदा रडताना तर नंतर लगेच काही सेकंदात तो हसताना देखील दिसतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल.
राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? वाचा एका क्लिकवर
व्हिडिओमध्ये दिसणारा हा मुलगा घानाचा रहिवासी असून त्याचे नाव अल्बर्ट ओफोसू नेकेतिया आहे. सात वर्षांच्या अल्बर्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या आईकडून काहीतरी मागताना रडतो आणि लगेच जोरात हसायला लागतो. खर तर तो रडताच त्याची आजी त्याला आनंद देण्यासाठी गाणे म्हणू लागते आणि तो हसायला लागत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शरद पवारांचा दाढीतला रुबाब तुम्ही पाहिलाय का; साहेबांच्या तरुणपणीचा फोटो होतोय व्हायरल
Ghana's 7-year-old Albert Ofosu Nketia has become an internet sensation following a viral video of him crying then laughing.
— Africa Facts Zone (@AfricaFactsZone) March 21, 2023
He asked his mum for yam, but she gave him plantain instead, and he started crying.
His grandmother sang to him to cheer him up, and he started laughing. pic.twitter.com/Gx8cHx5JwR
व्हिडिओबद्दल एक मनोरंजक गोष्ट म्हणजे अल्बर्टचा हा व्हिडिओ त्याच्या काकांनी बनवला होता, ज्यांनी त्यांचा मोबाइल विकला होता. त्यानंतर दुकानदाराने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांनतर हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला आहे. तो रडताना हसण्याची पद्धत आणि त्याचा निरागसपणा पाहून लोक त्याचे चाहते झाले आहेत. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
बायकोचे दागिने गहाण ठेऊन लोकांना फुकट हेल्मेट वाटतोय ‘हा’ माणूस; मित्राचा अपघात झाला म्हणून…