
उन्हाळा सुरू झाला की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बदल होतो. सर्वांचा कल चपाती भाकरीकडे कमी आणि फळांकडे जास्त असतो. उन्हाळ्यात सर्वात जास्त आंबा हे फळ खाल्ले जाते. या हंगामात भाज्या आणि फळे सहज उपलब्ध होतात. निरोगी राहण्यासाठी लोक आहारामध्ये जास्त समावेश करतात. यामध्ये आंबा फळ लोक आवडीने खातात. पण तुम्ही कधी पांढरा आंबा खाल्ला आहे का? नाही ना. चलातर मग जाणून घेऊया पांढऱ्या आंब्याची गोष्ट.
धक्कादायक! अल्पवयीन भाच्याने मामीला केले ब्लॅकमेल; मामीने उचलले थेट टोकाचे पाऊल
पांढरा आंबा हा आंब्याचा एक दुर्मिळ प्रकार आहे, जो मूळतः आग्नेय आशियामध्ये आढळतो. त्यात पांढऱ्या रंगाचा गाभा असतो. जो गोड आणि अतिशय रसाळ असतो. आंब्याच्या इतर प्रजातींपेक्षा, पांढरा आंबा खूप वेगळा आहे, त्यांच्या वेगळ्या चवमुळे तो अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. हा आंबा त्याच्या अनोख्या चवीसाठी आणि आकर्षक रंगासाठी ओळखला जातो.
चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त, बाळू धानोरकर यांच्या जागी कोण लढणार? ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत
या अनोख्या पांढऱ्या आंब्याला वाणी म्हणतात. हा आंबा फक्त बालीमध्येच मिळतो. हा आंबा वरून इतर आंब्यासारखा दिसत असला तरी आतून कापल्यावर पूर्ण पांढरा असतो. त्याच्या अनोख्या रंगामुळे आणि चवीमुळे, पांढरा आंबा सामान्यतः परदेशी बाजारात जास्त भावाने विकला जातो. हा हाफुस आंब्याचा एक प्रकार असून त्याचे वजन सुमारे 150 ग्रॅम ते 300 ग्रॅम असते. त्याच्या लागवडीसाठी उबदार हवामान आणि उच्च तापमान आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, काही लोकांना या आंब्याची चव दारुसारखी लागते. दुसरीकडे, काही लोकांच्या मते, त्याची चव टूथपेस्टसारखी आहेे असे सांगितले जात आहे.