सोलापूरची ‘ही’ प्रसिद्ध भेळ तुम्ही खाल्लीय का? ‘या’ स्वस्तात मस्त चवदार व पोटभर भेळीचा एकदा आस्वाद घ्याच!

Have you eaten 'this' famous Bhel of Solapur? Have a taste of 'Ya' cheap, tasty and filling lamb once!

खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत सोलापूरची एक वेगळी ओळख सर्वत्र आहे. सोलापूरचे मटण आणि शेंगदाणा चटणी तर लाजवाब मानली जाते. दरम्यान सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती, सोलापूरमधील सुप्रसिद्ध भेळीची! सोलापूर पासून 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मोहोळमधील भेळ प्रचंड फेमस आहे. या भेळीच्या एकाच प्लेटमध्ये दिवसभराची चव भागते. विशेष म्हणजे ही भेळ खाण्यासाठी याठिकाणी दिवसभर गर्दी असते.

मोठी बातमी! उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

स्वस्तात मस्त चवदार आणि पोटभर भेळ म्हणून या भेळीचा नावलौकिक सगळीकडे आहे. मोहोळ रेल्वे स्टेशन वरची भेळ म्हणून ही भेळ ओळखली जाते. सुरुवातीला ही भेळ फक्त 8 रुपयांना मिळत होती. मात्र या भेळीची किंमत आता 30 रुपये झाली आहे. या भेळीमध्ये गोड भेळ, ओली गोड भेळ, सुखी गोड भेळ, तिखट सुखी भेळ असे विविध प्रकार मिळतात. ( Famous Bhel Stall)

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा

महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील 16 वर्षांपासून या भेळीचा स्टॉल मोहोळ रेल्वे स्टेशन ( Mohol Railway Station) जवळ आहे. संजय देशमुख यांचा हा स्टॉल आहे. या भेळीसाठी लागणारे फरसाण व इतर गोष्टी अगदी उत्तम क्वालिटीचे वापरले जाते. तसेच या स्टॉलवर मिळणारी चटणी देखील अगदी खास आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या भेळीवर अनलिमिटेड काकडी व कांदा देखील मिळतो. संजय देशमुख या स्टॉल मधून दिवसाला 10 ते 15 हजार रुपये कमावतात.

आजही राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज; शेतकरी राजा चिंतेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *