
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. यानंतर शेतकरी आता 14 व्या हप्त्याची वाट बघत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एप्रिल व जुलै दरम्यान पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जारी होऊ शकतो. मात्र केंद्र सरकारने यावर अद्यापही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
मागील महिन्यात म्हणजेच 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी पीएम किसानचा 13 वा हप्ता जारी केला होता. देशभरातील 8 कोटींहून जास्त शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचा लाभ घेतला होता. परंतु, तरीदेखील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान असे शेतकरी किसान हेल्पलाइन नंबर 011-24300606 आणि 155261 वर कॉल करून चौकशी करू शकतात.
आजही राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज; शेतकरी राजा चिंतेत
पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता (PM Kisan yojana) मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ईकेवायसी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर ईकेवायसी केली नसेल आणि तुमच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक केलेले नसेल तर 14 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
चपलीच्या वजनावरून समोर आली एवढी मोठी तस्करी; चोराची शक्कल वाचून तुम्हीही व्हाल थक्क