Havaman Andaj : पुढील पाच ते सहा दिवस राज्यात कसा असेल हवामान अंदाज? जाणून घ्या एका क्लिकवर

What will be the weather forecast in the state for the next five to six days? Know in one click

Havaman Andaj : ऑगस्ट महिना सुरू होताच राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये ऊन सावल्याचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी कडक ऊन पडत असून काही ठिकाणी हलक्या प्रमाणात पाऊस देखील पडत आहे. मात्र चांगला पाऊस पडत नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या संकटात आहे.

Rain Update | पावसाने मोडला तब्बल १२२ वर्षांचा रेकॉर्ड, क्षणांतच इमारती जमीनदोस्त

राज्यातील अनेक शेतकरी सध्या मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, यामध्येच आता हवामान खात्याने पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे, राज्यांमध्ये पुढच्या पाच ते सहा दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Politics News । 16 आमदार पात्र होणार की अपात्र? शिंदे गटाचं 6 हजार पानी उत्तर, काय होईल निर्णय? जाणून घ्या

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण नाही त्यामुळे राज्यात पुढील पाच ते सहा दिवस पावसाच्या हलक्या सरी बसणार आहेत. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणांसह कडक ऊन पडलेले पाहायला मिळेल. त्याचबरोबर कोकण गोव्यात पुढील सातही दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळकी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Supriya Sule : राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली मोठी मागणी

खरिपाची पिके धोक्यात

सध्या खरिपाच्या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र अजूनही पाऊस झालेला नाही त्यामुळे खरिपांची पिके सुकू लागली आहेत. येत्या काही काळात पाऊस झाला नाही तर ही पिके जुळून नष्ट होतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Maharastra Rain । शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! पुढील पाच दिवस पाऊस नाही, काय आहे हवामान विभागाचा अंदाज? जाणून घ्या…

Spread the love