Havaman Andaj । सावधान! ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Havaman Andaj Today 9 Sepetember 2023

Havaman Andaj । राज्यभर मागच्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहेत. तब्बल एक महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता माना टाकलेली पिके पुन्हा बहल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानकारक वातावरण आहे. मागचा महिना पूर्ण कोरडा गेला होता. त्यामुळे पाऊस पडेल का नाही अशी चिंता शेतकऱ्यांना होती. अशा चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दोन-तीन दिवसापासून होत असलेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. (Havaman Andaj)

Crime News । धक्कादायक! सासऱ्याने केले जावयाचे अपहरण, कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित

दोन-तीन दिवसापासून राज्याच्या काही भागात पाऊस होत असला तरी अजूनही काही भाग असे आहेत ज्या ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जवळपास सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj : आत्ताची सर्वात मोठी बातमी! छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 16 नोव्हेंबर रोजी मुंबईत आणणार; सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा

या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

पुणे, सातारा, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना आज हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या सक्रिय झालेला पाऊस पुढील दोन तीन आठवडे कायम राहील असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्याची खरीप पिके हाती लागली नाही तरी रब्बी पिकाच्या दृष्टीने हा पाऊस महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामा वाया जाण्याचा धोका टळू शकतो.

Radhakrishna Vikhe Patil । आत्ताची मोठी बातमी! विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मिळणार 51 हजारांच बक्षीस; कोणी केली घोषणा?

Spread the love