Hatkanangale Lok Sabha | महाराष्ट्रातील काही ठिकाणी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान मतदान म्हंटल की अनेक ठिकाणी गोंधळ हा होतोच. कार्यकर्त्यांमध्ये मतदानाच्या दिवशी गोंधळ झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो सध्या देखील अशीच एक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन गटात तूफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान देखील काही काळासाठी थांबवावे लागले.
मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी असल्याचा दावा धैर्यशील माने यांच्या गटाने आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि गोंधळ घातला त्यामुळे मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले. यांनतर पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा मतदान सुरु झाले. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा सुरु आहे.