Dharashiv Election । महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मात्र हे मतदान पार पडत असतानाच धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीमध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यामध्ये तीन ते चार जण जखमी झाले असून एक जणाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेला व्यक्ती हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे.
भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी मतदान केंद्रावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे पाच ते सहा कार्यकर्ते या हल्ल्यांमध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिंदे गटाच्या 20 ते 22 कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.
Narayan Rane । मतदानादरम्यान भाजप नेते नारायण राणेंचा मोठा दावा, म्हणाले…