Jayant Patil । “अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात” जयंत पाटलांच्या दाव्याने उडाली सर्वत्र खळबळ

Jayant Patil

Jayant Patil । मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत काही आमदारांनी देखील भाजपसोबत (Bjp) हातमिळवणी केली. मात्र आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट म्हणाले, “अजित पवार यांना भाजपसोबत जाण्यासाठी मी परवानगी…”

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

अजित पवार यांच्याकडे गेलेल्या आमदारांसोबत माझी चर्चा झाली आहे. त्यांनी मला त्यांची भूमिका सांगितली आहे. यावेळी ते म्हणाले की, आम्ही मनापासून शरद पवारांसोबत आहेत असा खळबळजनक दावा जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर जयंत पाटील पुढे म्हणाले, अजित पवार गटातील आमदारांनी सांगितले की, आता थोडा दबाव आहे म्हणून आम्ही तिकडे राहतोय पण आतून आम्ही पवार साहेबांसोबतच आहोत. असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना जयंत पाटलांनी हा दावा केला आहे.

Amitabh Bachchan । अमिताभ बच्चन यांच्या अंगलट आली ‘ती’ जाहिरात, दाखल झाली तक्रार, नेमकं कारण काय?

त्याचबरोबर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर देखील निशाणा साधला आहे. जयंत पाटील म्हणाले, “सरकारचा फक्त सहा महिन्यांचा खेळ बाकी आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर परिस्थिती बदलणार आहे. देशात महागाई बेरोजगारी सारखे अनेक मुद्दे आहेत. मात्र याकडे सरकारचे लक्ष नाही. मणिपूर सारख्या हिंसाचारावर सरकार बोलत नाही या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे असं जयंत पाटील म्हणाले.

Pune Crime News । पुण्यातील धक्कादायक घटना! पैशासाठी माजी महिला नगरसेविकेवर मित्राने केला अत्याचार

Spread the love