आंतरराष्ट्रीय बाजारात (International markets) सोने आणि चांदीचे दर (Gold and silver rates) सतत बदलत असतात. अशातच आता सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे आता सोने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आहे. परंतु चांदीच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. जाणून घ्या सोने (Gold Rate) आणि चांदीचे नवीनतम दर (Silver Rate). (Latest Marathi News)
मिंधे गटातील बेइमानांना वाचविण्यासाठी ‘मोदी सरकार’ चे प्रयत्न सुरु; ठाकरे गटाची जहरी टीका
सोन्याच्या दरात MCX वर (MCX) आज ३५ रुपयांची वाढ होऊन ते ५८ हजार १४२ रुपयांच्या जवळ व्यवहार करत असून चांदी ११७ रुपये वाढीसह ६९ हजार ४५८ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार आता येत्या काही दिवसात किमतीत वाढ सुरू राहणार आहे. गुडरिटर्न साइटनुसार किमती पाहिल्या तर, २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम दर ५४,३५० रुपयांवर अपरिवर्तित आहे. तसेच २४ कॅरेटचे १० ग्रॅम सोने पुन्हा १०० रुपयांनी कमी झाले आहे. तर चांदीच्या किमतीत ६०० रुपयांची वाढ झाली आहे.
अर्रर्र.. टोमॅटोने पार केली शंभरी, पण शेतकऱ्यांना मिळतोय फक्त ‘इतकाच’ भाव
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कालच्या ७१ हजार ९०० रुपयांच्या तुलनेत चांदीचे दर ६०० रुपये वाढीसह ७१,५०० रुपयांवर पोहोचले आहे. त्याशिवाय आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात नरमाई दिसत आहे. कोमॅक्सवर सोने प्रति औंस $१९२४ वर तर चांदी प्रति औंस $२२.९३ वर घसरली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सोने खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे. सोने खरेदीवर तुमची हजारो रुपयांची बचत होईल.