मिंधे गटातील बेइमानांना वाचविण्यासाठी ‘मोदी सरकार’ चे प्रयत्न सुरु; ठाकरे गटाची जहरी टीका

Thackrey

भिवंडी (Bhiwandi) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १८ नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले आहे, त्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. “पंतप्रधान मोदी सरकारचा (Modi Govt) समान नागरी कायदा म्हणजे ‘हम करे सो’ समान कायदा, हे ढोंग आहे” अशा शब्दात ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Ashadhi Ekadashi । विठुरायाच्या गजरात पार पडली शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा, यंदाचे ‘हे’ ठरले मानाचे वारकरी

त्या १८ नगरसेवकांना अपात्र ठरवत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःसह ४० बेइमान आमदारांना अपात्र घोषित करून मोदी यांनी पुकारलेल्या समान नागरी कायद्याचा मान राखला पाहिजे. कारण आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे मोदी यांनी समान नागरी कायद्याला हात घातला आहे. एकाच देशात दोन कायदे नसावेत. परंतु ‘एक देश दोन कायदे’ हे मोदींच्याच राज्यात तयार झाले आहेत, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पाहा Photo

मिंधे गटाच्या ४० आमदारांना घटनेच्या १० व्या शेड्युलप्रमाणे अपात्र ठरवावेच लागणार आहे असा कायदा सांगत आहे. परंतु बेइमानांना वाचविण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान आता भिवंडीतील १९ नगरसेवकांना अपात्र ठरवल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाच्या टीकेला शिंदे गट कशाप्रकारे प्रत्युत्तर देतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बहुजनांच्या पोरांना भडकावणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झालीच पाहिजे; छगन भुजबळ यांची मागणी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *