Gautami Patil । मोठी बातमी! गौतमीला पाहण्यासाठी तरुणांनी जिवाचीही पर्वा केली नाही, थेट विजेच्या डीपीवर…

Gautami Patil

Gautami Patil । गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या नृत्यावरून तर कधी तिच्यावर टीका केल्यामुळे ती चर्चेत असते. लोक तिला पाहण्यासाठी कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतात, या गोष्टींवरून देखील तिच्यावरच टीका केली जाते. व त्याचा संबंध राजकारणाशी देखील जोडला जातो. सोशल मीडियावर गौतमी प्रचंड सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Viral Video । स्विमिंग ट्रेनर म्हणावं की राक्षस, लहान मुलांना विचित्रपणे शिकवतोय पोहायला; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे ( Gautami Patil Fans) चाहते आहेत. गावागावांत जत्रा, सण समारंभाच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम होतात. लोकांना उभे राहता येत नाही इतकी गर्दी गौतमीच्या कार्यक्रमांना असते. या गर्दीमुळे गौतमी अनेकदा वादात देखील अडकली आहे. ( New debate on gautami patil ) नुकतीच गौतमी ही लातूर शहरात एका बिर्याणी हॉटेलच्या ओपनिंगसाठी पोहचली होती.

Nandurbar Accident । ब्रेकिंग! दोन कार समोरासमोर धडकून भीषण अपघात; ४ जखमी

यावेळी गौतमी पाटील हिची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली. पाय ठेवायला देखील अजिबातच जागा नव्हती. या ठिकाणी गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. त्यामुळे तरुणांची तुफान गर्दी होती. दरम्यान, गौतमीला पाहण्यासाठी काही युवक हे थेट विद्युत डीपीवरच चढून बसले होते.

Maratha Aarakshan । ब्रेकिंग न्यूज! मराठा आंदोलनावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार

यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या टीपीमध्ये विद्युत प्रवाह सुरूच होता. गौतमीला पाहण्याच्या नादात, ते थेट डीपीवर चढून बसेल. या युवकांचे नशीब बलवत्तर की, त्यामुळे कोणताही चुकीचा प्रकार घडला नाही. यानंतर गौतमीने युवक डीपीवर चढल्याचे पाहिले त्यानंतर तिनेच स्वतः त्या युवकांना खाली उतरण्यास सांगितले.

Milind Deora । शिंदे गटातच प्रवेश का? मिलिंद देवरांची पहिली प्रतिक्रिया समोर

Spread the love