Ganpat Gaikwad Firing | महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार का केला? भाजप आमदार गणपत गायकवाडांनी सांगितलं धक्कादायक कारण

Ganpat Gaikwad Firing

Ganpat Gaikwad Firing | ठाणे जिल्ह्यातील हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात दोन जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजप आमदार आणि शिवसेना (शिंदे) गटाचे नेते यांच्यात हाणामारी झाल्यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबाराची ही घटना घडली. माहितीनुसार, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या आहेत.

BJP Mla Firing । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार

सध्या जखमीनावर जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. स्वत: खासदार श्रीकांत शिंदे तिथे उपस्थित आहेत. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. जागेच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस ठाण्यातच गोळीबार झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यस्थेबरोबर, या दोन्ही पक्षातील स्थानिक पातळीवरील मतभेद समोर आले आहेत.

Crime News । लग्नाच्या चर्चेने घेतला प्रेयसीचा जीव, प्रियकराने आधी तिचा गळा दाबून खून केला आणि..

गणपत गायकवाड काय म्हणाले?

“मी १० वर्षांपूर्वी घेतलेल्या जागेवर शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्ती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. महेश गायकवाड कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता” अस गणपत गायकवाड म्हणाले. त्याचबरोबर “काल संध्याकाळी देखील 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले. यावेळी त्यांनी माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना धक्काबुक्की केली. हे सर्व मला सहन झाले नाही म्हणून काल रात्री मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला” असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis । छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? देवेंद्र फडणवीसांनी केले मोठं वक्तव्य

Spread the love