Devendra Fadnavis । राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते पक्षांतर करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच मंत्री छगन भुजबळ सध्या भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो. अंजली दमानिया घेत नाहीत. अलीकडच्या काळात अंजली दमानिया सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) जास्त संपर्कात आहेत. त्यामुळे त्या अशा प्रकारचे ट्विट करत असतील. अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
पाहा अंजली दमानिया यांचे ट्विट
भुजबळ भाजप च्या वाटेवर? एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले होते त्यांच्या या ट्विटनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Poonam Pandey । मोठी बातमी! अभिनेत्री पूनम पांडेचं कॅन्सरने निधन; 32 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
भुजबळ भाजप च्या वाटेवर?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2024
एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?
अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?
कुठे फेडाल हे पाप