Ganpat Gaikwad CCTV Footage । बिग ब्रेकिंग! गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट

Ganpat Gaikwad

Ganpat Gaikwad CCTV Footage । मुंबईमधील हिललाईन पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजपचा एक आमदार पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) नेत्यावर गोळीबार करताना आणि नंतर त्याच्यावर व त्याच्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्याचे दिसले. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. राज्याच्या राजकीय वातावरणात देखील खळबळ उडाली आहे. यामध्येच आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात मोठा ट्विट आला आहे.

Ajit Pawar । ‘…तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही’, अजित पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य

पोलीस स्टेशन बाहेर आपल्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आल्याचं गायकवाड यांनी म्हटलं होतं. मात्र अशातच पोलीस स्टेशन बाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. सध्या हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये धक्काबुक्की कोणी केली याचा खुलासा देखील व्हिडीओमधून झाला आहे.

Ganpat Gaikwad । सर्वात मोठी बातमी! गणपत गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ

आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि त्याचे सहकारीने धक्काबुक्की करत वाद घालत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. वैभव गायकवाड सह इतर सहकारी वाद घालत असून पोलीस मध्यस्थी करत असल्याचंही सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या या सीसीटीव्ही फुटेजची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ज्यावेळी गणपत गायकवाड यांनी आतमध्ये गोळीबार केला त्यावेळी महेश गायकवाड यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाला आमदार गायकवाड यांच्या भाच्याने मारहाण केल्याचे देखील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

Ganpat Gaikwad Firing । गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातला नेमका वाद काय? धक्कादायक कारण आलं समोर

Spread the love