Ajit Pawar । ‘…तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही’, अजित पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य

Ajit Pawar

Ajit Pawar । राज्यात लवकरच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका (Election) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. आगामी निवडणूक यावेळी अटीतटीची असणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) वेगवेगळे लढणार आहे,” असा दावा देखील केला जात आहे.

Ganpat Gaikwad । सर्वात मोठी बातमी! गणपत गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ

यामध्ये सर्वांचे लक्ष हे बारामती मतदार संघाकडे लागले आहे. बारामतीतून अजित पवार गटाकडून कोण उभा राहणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, यामध्येच आता अजित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “लोकसभेलाही आपल्या विचाराचा बारामतीचा उमेदवार दिला तरच विकास होईल. बारामती लोकसभेला जर मला मिठाचा खडा लागला तर मी आमदारकीला वेगळा विचार करेन. त्यावेळेस मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही. असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

Crime News । धक्कादायक! जेवणात त्रुटी काढल्याने पत्नीचा राग अनावर, चाकूने केला थेट पतीवरच हल्ला

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “पाच वर्षे मी तुम्हाला बिनचूक आणि चोख काम करून दाखवले आहे. माझा दावा आहे की माझे काम कोणताच मायका लाल करू शकत नाही,” असेही अजित पवार म्हणाले. बारामतीत विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर एका कार्यक्रमात बोलत असताना अजित यावर यांनी हे वक्तव्य केले आहे.

Ganpat Gaikwad Firing । गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातला नेमका वाद काय? धक्कादायक कारण आलं समोर

Spread the love