Mukesh Ambani । सध्या शेअर बाजारात (Stock market) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातुन चांगली कमाई करत आहेत. तर काहींना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अशातच आता गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता जिओचा शेअर (Jio share) आपल्याला बाजारात धुमाकूळ घालताना दिसणार आहे. (Latest Marathi News)
जिओने यासाठी जोरदार तयारी केली आहे. जिओ फायनेन्शिअलचा शेअर (Jio Financial Share) लवकरच बाजारामध्ये सूचीबद्ध करण्यात येणार आहे. याबाबत नुकतीच बीएसईकडून एक नोटीस काढण्यात आली आहे. ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून (Reliance Industries) विभक्त झाली आहे. या शेअरची किंमत 20 जुलै रोजी निश्चित झाली आहे. ही किंमत एनएसईवर 261.85 रुपये प्रति शेअरवर किंमत निश्चित करण्यात आली आहे.
Banana with Milk । दूध आणि केळीचे एकत्रित सेवन आरोग्यासाठी कितपत फायद्याचे आहे? वाचा
म्हणजेच गुंतवणूकदारांची आता चांदी होणार आहे. समजा रिलायन्सचे 1000 शेअर असतील तर या गुंतवणूकदारांना JFSLचे 1000 शेअर मिळतील. हे शेअर्स बाजारात लवकरच सूचीबद्ध होतील त्यानंतर ट्रेडिंग सेक्शन सुरु होणार आहे. जिओचे स्मार्टफोन, लॅपटॉप नंतर आता जिओचे शेअर्स बाजारात धुमाकूळ घालतील. अनेक गुंतवणूकदार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Lumpy Disease । सरकारकडून पशुधनासाठी 170 कोटींचा खर्च, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती