Sushma Andhare । सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर जीवघेणा हल्ला

Fatal attack on estranged husband of Thackeray group leader Sushma Andhare

Sushma Andhare । बीड : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या सतत विरोधकांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून निशाणा साधत असतात. त्यांच्या वक्तव्यांवरून त्या कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहतात. अशातच आता त्या एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. बैठक संपवून घरी जात असताना त्यावेळी ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

Crime News । 10 वर्षांच्या मुलासमोरच सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे तीन लोकांनी केले अपहरण; त्यांनतर केले धक्कादायक कृत्य

याबाबत अधिक माहिती अशी की वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) हे नगर जिल्ह्यातील समाजाची बैठक संपवून घरी जात होते. त्यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून अचानक हल्ला केला. त्यामुळे वाघमारे चांगलेच घाबरले. या हल्ल्यात वाघमारे यांना त्यांच्या मुलाला आणि पुतण्याला खूप मार लागला आहे. या हल्ल्यानंतर वाघमारे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

Breaking News । ठाकरेंना धनुष्यबाण परत मिळणार? आज होणार महत्त्वाची सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडे वाघमारे यांनी मला सुरक्षा देण्यात यावी अशी बऱ्याच वेळा मागणी केली होती. परंतु त्यांच्या या मागणीची दखल घेतली नाही. सुरक्षा असती तर हा हल्ला झाला नसता अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला सुरक्षा द्यावी आणि हल्ल्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Asia Cup 2023 । भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय! आठव्यांदा जिंकले विजेतेपद

Spread the love