Siddharth Jadhav: सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव आता साऊथच्या दिग्गज कलाकारांसोबत झळकणार, केली ‘या’ चित्रपटाची घोषणा

Everyone's favorite Siddharth Jadhav will now star with the legendary actors of the South, Kelly announced the film 'Ya'

मुंबई : अभिनेता म्हणजे सि द्धार्थ जाधव हा आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतो. नेहमी हसणारा – हसवणारा मराठी अभिनेता म्हणल की प्रेक्षकांच्या तोंडात एकच नाव येतं ते म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav) सध्या सिद्धार्थ सातत्याने कॅमेऱ्यासमोर आणि चर्चेत आहे. सध्या तो स्टार प्रवाह वरील ‘आता हाऊदे धिंगाणा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.दरम्यान आज गांधी जयंती निमित्त सिद्धार्थने एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्ट मध्ये त्याने झी स्टुडीओने त्यांच्या नव्या आगामी चित्रपटाची घोषणा असून हा चित्रपट मूकपट असणार आहे.

Eknath Shinde: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

हा मूकपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून एक डार्क कॉमेडी प्रकारातील चित्रपट आहे.या चित्रपटाचे नाव ‘गांधी टॉक्स’ (Gandhi Talks) असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर बेळेकर यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi), अरविंद स्वामी (Arvind Swami) आणि अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिले आहे.

खुशखबर! व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये ‘इतक्या’ रुपयांनी कपात

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यामध्ये सर्वांच्या हातात पैसे दिसत आहे. इतकंच नाही तर कुणाच्या तोंडात तर कुणाच्या डोक्यावर पैसे चिकटवलेले दिसत आहेत.यातून अस स्पष्ट होत आहे की हा चित्रपट पैशांवर आधारित आहे.झी स्टुडिओज, क्युरियस डिजिटल आणि मूव्ही मिल एंटरटेनमेंट यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.विशेष म्हणजे सिद्धार्थ जाधवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून टीझर पोस्ट करून ही मोठी बातमी चाहत्यांना दिली आहे.

धक्कादायक! इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *