Eknath Khadse । भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच एकनाथ खडसे यांना बसला सर्वात मोठा धक्का

Eknath Khadse

Eknath Khadse । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group) मागील काही दिवसांपासून अडचणी वाढत चालल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) पक्षातील अनेक नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. निवडणुकीत याचा फटका शरद पवार गटाला बसू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. (Latest marathi news)

Lok Sabha Elections 2024 । काँग्रेस नेत्याचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, “निवडणुकीत माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे”

त्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या जागेतून अवैध खनिजांचे उत्खनन केलं असल्याने विशेष एसआयटी स्थापन करण्यात आली होती. पण त्यानंतर एसआयटीला स्थगिती दिली होती. आता याप्रकरणी आव्हान देणारी याचिका मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दाखल केली आहे.

Nana Patole । विशाल पाटील नॉट रिचेबल नाना पटोलेंनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही निवडणूक…”

याप्रकरणी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आर. एम. जोशी यांनी एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रक्षा खडसे, रोहिणी खडसे, राज्य शासन, नाशिकचे विभागीय आयुक्त, जळगावचे जिल्हाधिकारी, भुसावळचे उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Maharastra Politics । ब्रेकिंग! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेसचे दोन बडे नेते नॉटरिचेबल

Spread the love