Smartphone Tips । तुमचाही फोन सतत हँग होतोय का? तर ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो

Does your phone keep hanging up too? So follow these tips

Smartphone Tips । सध्याच्या काळात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर केवळ कॉलिंग पुरता मर्यादित राहिला नाही. तर त्यावर अनेक कामं केली जातात. नोकरदारवर्ग ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाकडेच आपण स्मार्टफोन पाहतो. बऱ्याच वेळा स्मार्टफोन काही दिवस वापरल्यानंतर हँग होतात. काहीवेळा ते इतके स्लो काम करतात (Smartphone Performance) की त्यामुळे आपली चिडचिड होऊ लागते. ज्या फोनची रॅम कमी असते, त्या फोनमध्ये तर ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. (Latest Tech News)

Onion Price । शेतकऱ्यांना मोठा धक्का! कांद्याचे दर रोखण्यासाठी सरकारने घेतला निर्णय

बहुतांश स्मार्टफोन कंपन्यांच्या बाबतीत ही समस्या आढळून येते. परंतु ही समस्या नेमकी कशामुळे येते? त्यासाठी काय करावे? हे अनेकांना समजत नाही. तसेच स्मार्टफोन दुरुस्तीला दिला तरीही ठोस उपास सापडत नाही. जर तुम्हालाही अशीच समस्या येत असेल तर काळजी करू नका. आता तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कमी रॅमचा फोनही (Smartphone Ram) फास्ट चालेल.

Rain Update । राज्यात पावसाचं कमबॅक केव्हा होणार? हवामान खात्याने दिले महत्त्वाचे संकेत

लक्षात ठेवा या गोष्टी

  • जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करत असाल, तर तुमच्या स्मार्टफोनच्या ब्राउजरवर डेटा सेव्हर मोड करा. असे केल्याने वेबपेजेस कंप्रेस होतात आणि फोनवर येणारा ताण कमी होतो.
  • स्मार्टफोनमध्ये जंक फाईल्स, कॅशेस जमा होतात. याचा परिणाम फोनवर होतो. त्यामुळे सतत हे कॅशेस क्लिअर करावे.
  • समजा एखादं अ‍ॅप चालू केल्यानंतर तुम्ही थेट होम स्क्रीनवर गेला की ते अ‍ॅप बॅकग्राउंडमध्ये चालू असते. असेच तुम्ही इतर अ‍ॅप चालू केली तर तुमचा फोन स्लो होतो. त्यामुळे काम झाले की ते अ‍ॅप बंद करा. त्याशिवाय अनावश्यक अ‍ॅप्सही डाउनलोड करू नका.

Politics News । शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र, ‘या’ विषयावर झाली चर्चा

Spread the love