Mandvgaon News । मांडवगण येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि सन फार्मा लॅबोरेटरी लिमिटेड यांच्या वतीने महिलांना सायकल कोळपेचे वाटप…

Mandvgaon News

Mandvgaon News । दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी मौजे मांडवगण तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) सन फार्मा लॅबोरेटरी लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ‘जलसुरक्षाद्वारे ग्रामीण समुदायाचे जीवनमान सुधारणे प्रकल्प’ राबवत आहे त्यानिमित्ताने या प्रकल्पांतर्गत मांडवगण गावातील एकूण 29 बचत गटांतिल शेतकरी महिलांना 145 सायकल कोळपे महिलांच्या कामाचे ओझे कमी करण्यासाठी देण्यात आले, शेतात पारंपारिक पद्धतीने महिला खुरपणी करत असताना त्यांना अधिक श्रम लागत असे तसेच पाठ दुखीचा त्रास ही होत असे त्यावर पर्याय म्हणून सायकल कोळपे अतिशय परिणामकारक

Ladki Bahin Yojna । मोठी बातमी! “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना वगळण्याचा सरकारचा निर्णय”

आहे. त्यामुळे महिलांचा कामाचे ओझेही कमी होईल तसेच कमी वेळेत जास्त कामे होतील. सदरील कार्यक्रमास वॉटर संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री लोमेश जोरी तांत्रिक अधिकारि श्री स्वप्निल अंतरे सामाजिक अधिकारि श्री जीवन खरात, मांडवगण ग्राम विकास समितीचे अध्यक्ष श्री सुभाष शिंदे, श्रीराम असंघटित बांध कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री माऊली कन्हेरकर . ग्रामस्थ. श्री शुभम घोडके ,अशोक भुतकर, आणि बचत गटातील महिला व आशा सेविका सौ वर्षा चव्हान, व बचत गटातील सदस्य सौ सविता घोडके. ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ वंदना शिंदे , आदी उपस्थित होत्या.

Delhi Election Results 2025 | अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया पराभूत, दिल्लीमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

संग्राम देशमुख
(प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,शेतकरी आघाडी)

Spread the love