Ladki Bahin Yojna । मोठी बातमी! “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना वगळण्याचा सरकारचा निर्णय”

Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna । महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून काही महिलांना वगळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक मदतीचा लाभ मिळतो, मात्र काही महिला अपात्र ठरल्यामुळे त्यांना योजनेतून वगळले गेले आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिलांसह 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या, चारचाकी गाडी असलेल्या, आणि इतर अपात्र महिला वगळण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण 5 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

Shirish Maharaj More | धक्कादायक ! संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या !

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. या योजनेची अंमलबजावणी 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. तथापि, अपात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आणि त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

Delhi Legislative Assembly । दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५; सकाळपासून मतदानाला सुरवात

त्याचवेळी, महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेतून लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या घोषणेच्या अंमलबजावणीकडे आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Shrihari Kale | सर्वात मोठी बातमी! शरद पवार गटाच्या नेत्याचा अपघाती मृत्यू

Spread the love