Pune Accident News । पुण्यात थरकाप उडवणारा अपघात! रस्ता ओलांडताना बाईकस्वाराची व्यक्तीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Pune Accident News

Pune Accident News । रस्ता ओलांडताना काळजी घेऊन रस्ता ओलांडावा असे नेहमीच सांगितले जाते. मात्र असे असले तरी देखील रस्ता ओलांडताना अनेक भीषण अपघात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सध्या देखील रस्ता ओलांडताना पुण्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील उरळी कांचन या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Poonam Pandey । मोठी बातमी! अभिनेत्री पूनम पांडेचं कॅन्सरने निधन; 32 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास रस्ता ओलांडताना एका तरुणाला दुचाकी चालकाने धडक दिली. या धडकेत उरुळी कांचन येथील व्यक्ती गंभीर जखमी झाला असून दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Politics News । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार? मुंबईतील दोन बडे नेते अजित पवार गटात सामील होणार

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला तेथील स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातामध्ये बाईकस्वाराचा जणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Chhagan Bhujbal । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?

Spread the love