Devendra Fadnavis । काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत दिलेल्या वक्तव्यावरून वाद वाढत आहे. भाजप नेते राहुल गांधींवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधींनी तातडीने माफी मागावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक संबोधून हिंदुत्वाचा अपमान केला आहे. या कृत्याबद्दल राहुल गांधींनी लोकसभेत सर्व हिंदूंची माफी मागावी. असं फडणवीस म्हणाले आहेत. माहितीनुसार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपवर देशात हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत असल्याचा आरोप केला. याशिवाय हे लोक हिंदू नाहीत, कारण ते २४ तास हिंसाचारावर बोलतात, असा दावाही त्यांनी केला.
Bjp । ब्रेकिंग न्यूज! भाजपने जाहीर केली विधानपरिषदेच्या ५ उमेदवारांची नावे
राहुल गांधींनी भाजपवर हा आरोप केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेत काँग्रेसच्या नेत्याने संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटले आहे.