Delhi Borewell Accident । धक्कादायक बातमी! खेळता-खेळता चिमुकला ४० फूट बोअरवेलमध्ये पडला; पाहा व्हिडीओ

Delhi Borewell Accident

Delhi Borewell Accident । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खेळता खेळता एक मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दिल्लीतील केशापूर मंडी परिसरात घडली आहे. केशापूर मंडीजवळ दिल्ली जल बोर्ड प्लांटच्या आत 40 फूट खोल बोअरवेल आहे, ज्यामध्ये एक मुलगा खेळत असताना अचानक पडला. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा आणि दिल्ली पोलिसांनी मुलाला वाचवण्यासाठी घटनास्थळ गाठले. यानंतर परिस्थितीचा आढावा घेत एनडीआरएफच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सध्या मुलाच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र यश मिळालेले नाही.

Devendra Fadanvis । खळबळजनक! देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमातच महिलेचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर

बचावकार्य सुरू असल्याचे दिल्ली अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. लवकरच मुलाला सुखरूप बाहेर काढले जाईल. असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे. माहितीनुसार, बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच अन्य कोणतीही माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का! महिला नेता ठोकणार पक्षाला रामराम

समांतर आणखी एक बोअरवेल खोदण्यात येणार

मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यू टीम बोअरवेलच्या शेजारी आणखी एक बोअरवेल खोदण्याच्या तयारीत आहे. ज्या खड्ड्यात मुलगा पडला त्याची खोली 40 फूट आहे. अशा परिस्थितीत ते बाहेर काढणे कठीण होऊ शकते. त्याचबरोबर नवीन बोअरवेल खोदण्यासही वेळ लागू शकतो.

Lok Sabha Elections । बिग ब्रेकिंग! अजितदादांची अमित शहांकडे लोकसभेसाठी ‘इतक्या’ जागांची मागणी

Spread the love