Lok sabha Election । सर्वात मोठी बातमी! ..तर प्रायव्हेट कंपन्यांवर होणार कारवाई

Lok sabha Election

Lok sabha Election । राज्यात लोकसभेच्या निवडणुकांची जोरात तयारी सुरु आहे. राजकीय पक्ष ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनं आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीत सहभागी होत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आता राज्यात कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. (Latest marathi news)

Maharashtra politics । निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

अशातच आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान पार पडणार असून मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असणारे पण ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुटी किंवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Ajit Pawar । विरोधकांना बसणार धक्का! लोकसभेत विजयी होण्यासाठी अजितदादांची सर्वात मोठी खेळी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी किंवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

Dhairyasheel Mohite Patil । लोकसभेच्या तोंडावर भाजपला बसला मोठा धक्का; बड्या नेत्याने केला शरद पवार गटात प्रवेश

Spread the love