Devendra Fadnavis । मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले मिश्किल उत्तर, म्हणाले…

Devendra Fadnavis । नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात जरी शिंदे- फडणवीस यांचे सरकार आले असले तरी अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. त्यावरून या सरकारला अजूनही विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. आता यावर फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. ‘लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल,’ असे त्यांनी सांगितले आहे.

‘…म्हणून सुप्रिया मला अमिताभ बच्चन म्हणाली’, अखेर अजित पवार बोललेच

श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर फडणवीस यांच्याकडून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘सोलापूर – तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्ग पूर्ण होण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. त्यांना केंद्र सरकारकढूनही मदत केली आहे. राज्याचा हिस्सा मंजूर केला असून लवकरच हे काम पूर्ण होईल.मंत्रिमंडळात राणाजगजितसिंह पाटील यांचा समावेश होणार का? असा त्यांना प्रश्न विचारताच ते हसले आणि म्हणाले ‘लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल.

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी जयसिंघानीयाला मोठा धक्का, ईडीने जप्त केली ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘तहानलेल्या मराठवाड्याला पाणी देण्यासोबत कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे पाणी उजनी धरणामध्ये आणण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठविला असल्याने आता मराठवाड्याला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल.’ त्यांनी अनेक वर्षांपासून रखडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे यंत्रपूजन केले. तसेच त्यांच्या हस्ते लातूर पोलिस दलाला 15 अत्याधुनिक चारचाकी वाहने सुपूर्द केली आहेत.

भाजपला मोठा धक्का! ‘या’ Maharashtra Rain Alert : सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊसबड्या नेत्याला झाली अटक

यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अभिमन्यू पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तीरमनवार, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे,मुख्य अभियंता विजय घोगरे आणि संभाजी पाटील निलंगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra Rain Alert : सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *