Udayanraje Bhosale । आज संपणार साताऱ्याचा सस्पेन्स, भाजपकडून मिळणार उदयनराजेंना संधी?

Udayanraje Bhosale

Udayanraje Bhosale । अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) येऊन ठेपल्या आहेत. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार देखील निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराला लागले आहेत. महायुतीमध्ये काही जागांवरून वाद सुरु आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाची (Satara Lok Sabha Constituency) जागा कोणाला मिळतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest marathi news)

Crime News । आईच्या नात्याला काळिमा! घेतला पोटच्याच लेकरांचा जीव, कारण वाचून बसेल धक्का

आज साताऱ्याच्या जागेचा तिढा सुटू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत भाजपची (BJP) 9 वी यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीत महायुतीकडून उदयनराजे भोसले यांचं नाव जाहीर केलं जातं का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर भाजपने उदयनराजे भोसले यांचं नाव जाहीर केलं तर साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स आज संपू शकतो.

Sharad Pawar । मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या गळाला

सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांची नावं या यादीतून जाहीर होऊ शकतात. जवळपास 8 ते 10 उमेदवारांची नावं यात असतील. तसेच महाविकास आघाडीने देखील सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष साताऱ्याच्या जागेकडे लागले आहे.

Ahmednagar News। हृदयद्रावक! मांजरीला वाचवण्याच्या नादात ५ जणांचा शोष खड्ड्यात बुडून मृत्यू

Spread the love