Ahmednagar News। हृदयद्रावक! मांजरीला वाचवण्याच्या नादात ५ जणांचा शोष खड्ड्यात बुडून मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News । अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मांजरीला वाचवायला गेलेल्या पाच जणांचा बायोगॅसच्या शोष खड्ड्यात (Biogas absorption pits) बुडून मृत्यू झाला आहे. शेण – मुत्र टाकण्यासाठी हा शोषखड्डा तयार केला होता. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest marathi news)

Pune Crime । २ मुलींसोबत जेवण करून मुलगा बाहेर आला अन् अज्ञातांनी केला हल्ला; पुण्यातील विद्यापीठात धक्कादायक प्रकार

याबाबत अधिक माहिती अशी की, मांजर शोषखड्ड्यात पडली होती. त्यामुळे बायोगॅसच्या (Biogas) खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवायला एकजण उतरला, तो बुडत असल्याने इतरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे बायोगॅसचा खड्डा शेणाने भरला होता. नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये ही घटना घडली आहे. यातील एकजणाला वाचवण्यात यश आलं असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Election 2024 । ब्रेकिंग! शरद पवार गटाची आज लोकसभेची तिसरी यादी जाहीर होणार

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि तहसीलदारांनी धाव घेतली होती. स्थानिकांनी शोष खड्ड्यात बुडालेल्या एकाला बाहेर काढलं असून सध्या त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. त्या व्यक्तीला उपचारासाठी नेवासा येथील रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. दरम्यान, आपत्कालीन यंत्रणा नसल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला होता.

Ajit Pawar । अजित पवारांनी आपलेच सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचा घेतला चांगलाच समाचार

Spread the love