Bjp । सध्या महायुतीत जागा वाटपावरून घमसान सुरू आहे. बारामती देखील लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. यामध्येच आता रायगड जिल्ह्यात देखील बारामती सारखेच चित्र निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र मागच्या वर्षी पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी भाजपच्या वरिष्ठ लोकांनी सांगितले होते की, रायगड मधून लोकसभा सभेवर उमेदवारी देऊ. तेव्हापासून धैरशील पाटील आणि भाजपने प्रचारा सुरुवात केली. मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने सर्व गणित बिघडले असल्याचे दिसत आहे.
Vijay Shivatare । बारामतीत मोठ्या घडामोडी, विजय शिवतारे यांचं सर्वात मोठं विधान
मागच्या सहा महिन्यापासून धैर्यशील पाटील यांनी अनेक सभा, मेळावे घेऊन रायगडवर आपला दावा अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रायगडची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे. पर्यायाने जर आम्हाला जागा मिळाली नाही तर खूप वाईट होईल. वेगाने निर्णय घेतला जाईल असा इशारा यावेळी भाजप नेत्यांनी दिला आहे.
Baramati Lok Sabha । अजितदादांची धक्कादायक बातमी; शिंदे गटानेही दर्शवला बारामतीत विरोध
त्याचबरोबर वेळ पडली तर विजय शिवतारे यांच्या प्रमाणे निर्णय घेतला जाईल. असे देखील धैर्यशील पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे भाजपचे टेन्शन अजूनच वाढले आहे. त्यामुळे आता धैर्यशील पाटील हे विजय शिवतरेंसारखा निर्णय घेणार का? भाजपमधून ते बाहेर पडणार का? अशा अनेक चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.