सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून एका व्यक्तीने ही धमकी दिल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Death threat to Sharad Pawar)
महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये जाणार धोनीचा ‘हा’ लाडका खेळाडू धनंजय मुंडेंच्या संघाकडून खेळणार!
सौरभ पिंपळकर या ट्विटरवर हँडलवरुन शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. ‘भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल. अशा स्वरूपाची धमकी शरद पवार यांना देण्यात आली आहे. आता यानंतर शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या लगेचच पोलीस आयुक्तांना भेटल्या आहेत.
सुप्रिया सुळे पोलीस आयुक्तांना भेटल्या असून त्यांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनीही या प्रकरणी कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. शरद पवारांना धमकी आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे.
Monsoon Update । ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्रात पाऊस, हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला मोठा अंदाज