Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! विश्वासू आमदाराने सोडली साथ, तर दुसऱ्या आमदाराची नाराजी जाहीर

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागा वाटपासाठी बैठक सुरु आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा मुद्दा वंचितमुळे रखडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Crime News । धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विश्वासू आमदार रवींद्र वायकर (Rabindra Waikar) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी देखील आपली जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कमिशनचा हिस्सा पोहचल्यामुळे अमोल कीर्तिकरांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली, असा आरोप निरुपम यांनी यावेळी केला आहे.

Nashik News । ब्रेकिंग! गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला, अनैतिक संबंधातून माजी सैनिकाची हत्या

“ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता आली त्यावेळी मला मंत्रीपद दिले नाही. शिवसेना फुटली त्यावेळी देखील मला गटनेतेपद दिले नाही. आता भविष्यातदेखील मला पद मिळणार नाही. असे असले तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये पार पडलेल्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळाव्यात स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता ही साथ २०२४ च्या विधानसभेपर्यंतच असणार की काय? अशी चर्चा रंगली आहे.

Rohit Pawar । रोहित पवार यांचा भर पत्रकार परिषदेत सर्वात मोठा गौप्यस्फोट!

Spread the love