Baramati Lok Sabha । सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या मध्यस्थीला यश, विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला

Vijay Shivtare

Baramati Lok Sabha । सध्या राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मागच्या अनेक दिवसापासून राजकीय वाद आहे. मात्र आता तो वाद अखेर मिटला असून दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतल्या नेत्यांमधील वाद आता जवळपास संपला आहे.

Topers Ad

Crime News । अपहरण आणि हत्या… इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून उघड झाले खुनाचे रहस्य; घटना वाचून बसेल धक्का

याबाबत विजय शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बारामती मतदारसंघ मागच्या काही दिवसापासून चांगला चर्चेत आहे. कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. त्यामध्ये बारामती मतदारसंघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी देखील अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बारामतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

Navneet Rana । ब्रेकिंग! अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपने दिली उमेदवारी

विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांचे टेन्शन वाढले होते. त्यामुळे पुन्हा एकदा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे यांच्या सोबत वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मन धरणीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Baramati News । अभि नवनाथ मदने यांची राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड!

Spread the love