baramati lok sabha constituency । ब्रेकिंग! सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का; त्या प्रकरणी निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Baramti News

baramati lok sabha constituency । बारामती मतदारसंघात (Loksabha Election) यंदा अटीतटीची लढत पार पडणार आहे. कारण पहिल्यांदाच या मतदासंघात नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)

Brijbhushan Singh | सर्वात मोठी बातमी! लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या बृजभूषण सिंह यांच्याबद्दल मोठी बातमी समोर

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांच्या अडचणी वाढवणारा प्रकार घडला आहे. या दोन्ही नेत्यांना निवडणूक आयोगने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. खर्च कमी दाखवला असून खर्चात तफावत आढळून आल्याने ही नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना ४८ तासात खुलासा करण्याचे देखील सांगितले आहे.

Scorching Heat । सावधान! उष्णतेची लाट येणार…मे महिन्यात आणखी तीव्र उष्णतेची शक्यता; ‘या’ राज्यांना बसेल फटका

निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावली आहे. सुप्रिया सुळे यांच्या खर्चात १ लाख ३ हजार रुपयाची तफावत आढळली आहे. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या तपासणीत निवडणूक खर्चात ९ लाख १० हजाराची तफावत आढळून आली आहे.

Yogi Adityanath । सांगलीत योगी आदित्यनाथ कडाडले; म्हणाले, “काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर…”

Spread the love