Ashok Saraf Nilu Phule । ‘निळूभाऊंनी माझा नादच सोडला’ अशोक सराफ यांचं वक्तव्य

Ashok Saraf's statement 'Nilubhau left me alone'

Ashok Saraf Nilu Phule । मराठी कलाविश्वातील (Marathi Film Industry) दिग्गज अभिनेते म्हंटल की आपल्यासमोर अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निळू फुले (Nilu Phule) यांचं नाव आल्याशिवाय राहत नाही. या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आजही या दोघांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात. परंतु निळू फुलेंना अशोक सराफ यांच्यापेक्षा जास्त अनुभव होता.

रोज शेतात राबायची Youtube वर पाहून केला अभ्यास अन् मिळवले नीटमध्ये यश, आता होणार डॉक्टर; ज्योतीची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल

या दोघांना आपण ‘माझा पती करोडपती’, ‘दीड शहाणे’ तसेच ‘गडबड घोटाळा’,‘बिन कामाचा नवरा’ यांसारख्या चित्रपटांत एकत्र काम करताना पाहिले आहे. दोघांचा अभिनयही तितकाच दांडगा. या दोघांनीही अनेक भूमिका साकारल्या. आजही या दोघांसारखे काम करू कोणाला जमत नाही.

“भाजपवाले शिंदे गटाला 50 खोके म्हणत असतील तर…”, ‘त्या’ बॅनरवरून अजित पवारांनी डिवचलं

सराफ यांनी निळू फुलेंसोबतचा एक किस्सा ‘मी बहुरुपी’ या पुस्तकात सांगितला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, ‘मला फुलेंसोबत सहकलाकार काम करायला आवडत असे. त्यांना राजकीय आणि सामाजिक भान होते. तसेच त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याची आस शेवट्पर्यंत जपली असून त्यात त्यांचा हातखंडा ही होता. विशेष म्हणजे त्यांनी कधीच या गोष्टीचा गाजावाजा केला नाही.’

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडक यांनी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली अन् समाधीसमोर झुकलेही…

इतकेच नाही तर त्यांचं वाचन दांडगं होतं. सेटवर एकत्र असताना ते मला वाचन करायला सांगत असायचे. परंतु माझं मन कधी त्या पुस्तकात रमल नाही. कारण माझं सगळं मन हे माझ्या अभिनयावरच असायचे. एकदा असेच मी त्यांना म्हणालो ‘निळूभाऊ, कितीही वाचलं आणि काहीही वाचलं तरी शेवटी दिग्दर्शकानं सांगितलं उड्या मार की मी शेवटी उड्याच मारणार!’, आणि शेवटी त्यांनी माझा नादच सोडून दिला.

Devendra Fadnavis । मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले मिश्किल उत्तर, म्हणाले…

दरम्यान, अशोक सराफ हे बऱ्याच दिवसापासून कलाविश्वपासून लांब आहेत. त्यामुळे अशोक मामांच्या कलाविश्वपासून लांब राहण्याने चाहत्यांना अनेक प्रश्न पडत आहे. नुकतेच त्यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी रुपेरी पडद्यापासून दूर राहण्याचं कारण सांगितलं. तसेच त्यांना वाटत असणाऱ्या एका गोष्टीची प्रचंड खंत वाटते असेही सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *