
Ashok Dhodi l गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेले शिवसेना नेते अशोक धोडी यांचा मृतदेह अखेर मिळाला आहे. 20 जानेवारीपासून हरवलेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह गुजरातमधील सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल आढळून आला. पोलिसांनी त्यांची गाडीही शोधून काढली. प्रारंभिक तपासानुसार, अशोक धोडी यांचा अपहरण करून त्यांची हत्या त्यांच्या लहान भावानेच केली, असे उघड झाले आहे.
Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, पुण्यातील माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार
अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी आणि त्याचे साथीदार हे दारू तस्करीच्या अवैध धंद्यात सामील होते. अशोक धोडी त्यांच्या या धंद्यात अडचण बनल्याने अविनाश आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचे अपहरण केले आणि नंतर हत्या केली. मृतदेह फेकण्यासाठी आरोपी गुजरात गाठले होते. पालघर पोलिसांनी सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह आणि गाडी बाहेर काढली.
या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी अविनाश धोडी आणि इतर तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पालघर पोलिसांनी तात्काळ फरार आरोपींवर कारवाई सुरू केली आहे, आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठीही अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत.