Ashok Chavan । अशोक चव्हाण आजच करणार भाजपमध्ये प्रवेश

Ashok Chavan

Ashok Chavan । या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha and Assembly Elections) महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (६५) यांनी सोमवारी पक्ष सोडला असून ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. माजी लोकसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) आणि वांद्रेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्यानंतर चव्हाण यांचे जाणे हे सलग तिसरे जाणे आहे, पण अनुभवी म्हणून त्यांची विश्वासार्हता पाहता हा काँग्रेसला मोठा धक्का आहे.

Ashok Chavan । काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यांनतर अशोक चव्हाण यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जन्मापासून आतापर्यंत…”

अशोक चव्हाण यांनी काल राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असे म्हणाले होते. मात्र आजच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! काँग्रेसचे आठ-दहा माजी नगरसेवक शिवसेना-भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत?

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर साडे 12 वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होणार असून आमदार अमर राजूरकर हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच भाजपमध्ये प्रवेश आहेत.

Ashok Chavan । काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर अशोक चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “फक्त दोन दिवस थांबा..”

Spread the love