तुम्हीही Swiggy वरून ऑनलाईन जेवण मागवताय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी…

Are you also ordering food online from Swiggy? So this news is for you…

स्विगी ही ऑनलाइन फूड डिलिव्हर करणारी आघाडीची कंपनी आहे. दरम्यान स्विगीच्या ग्राहकांना सध्या फूड ऑर्डरवर अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. स्विगी कंपनीने आता कार्ट व्हॅल्यू व्यतिरिक्त प्रति फूड ऑर्डरसाठी २ रुपये प्लॅटफॉर्म फी ( Platform fee at Swiggy) वसूल करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. स्विगी युजर्स आतापर्यंत फूड ऑर्डर करण्यावर डिलिव्हरी फीस आणि टॅक्स भरत होते. मात्र इथून पुढे हा २ रुपयांचा अतिरिक्त चार्ज देखील भरावा लागणार आहे. ( Online food Delivery)

Uorfi Jawed: उर्फी जावेदची संपत्ती ऐकून बसेल धक्का; महिन्याला कमावते इतके रुपये

महत्त्वाची बाब म्हणजे फक्त मुख्य प्लॅटफॉर्मवर फूड ऑर्डर केले तरच हा अतिरिक्त चार्ज लावला जात आहे. हा भार इंस्टामार्ट युजर्ससाठी ( instamart Users) लागू नाही. स्विगीच्या प्रवक्त्यांनी या अतिरिक्त चार्जबाबत नुकतेच आपले मत मांडले आहे. “फूड ऑर्डवर प्लॅटफॉर्म फी हा एक साधारण शुल्क आहे. यामुळे कंपनीला प्लॅटफॉर्म व्यवस्थितरित्या संचालित करण्यासाठी आणि चांगले अपग्रेड करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच काही अखंडीतपणे सेवा प्रदान करण्यासाठी याची मदत होणार आहे.”

गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून लग्नात नातेवाईकांमध्ये वाद; झाली तुफान मारामारी

ही अतिरिक्त प्लॅटफॉर्म फी फक्त बंगळुरू व हैदराबाद शहरात लागू करण्यात आली आहे. मुंबई आणि दिल्ली ( Mumbai & Delhi) मध्ये ही फी लागू केलेली नाही. स्विगी कंपनीसाठी २ रुपये कमी वाटत असले तरी स्विगीला दररोज लाखो ऑर्डर येतात. यामुळे यातून मोठी रक्कम जमा होऊ शकते. बंगळुरू आणि हैद्राबादमध्ये ही फीस मागच्या आठवड्यात लागू केली होती. आता लवकरच सर्व शहरांमध्ये ती लागू केली जाईल.

विराट कोहलीने रोहित शर्माबाबत केला मोठा खुलासा! म्हणाला, “रोहितची ‘ही’ सवय घातक…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *