सध्या यूपीच्या बहराइच जिल्ह्यात एका लग्नाची जोरदार चर्चा आहे. प्रियकराला मिळवण्यासाठी एका मुलीने जात, धर्म या सर्व सीमारेषा मोडून काढल्या आहेत. तिने धर्म बदलला आहे. यानंतर तिने तिच्या प्रियकराशी लग्न केले. तिने उचललेल्या या पाऊलामुळे जिल्ह्यात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरच्यांच्या विरोधाला न जुमानता रुबिना खान हिने शेषकुमार अवस्थीसोबत मंदिरात सात फेरे घेतल्या. तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर दोघांनाही पूर्ण सुरक्षेसह मुलाचे वडील कन्हैया लाल अवस्थी यांच्याकडे सोपवण्यात आले. शिवपुरा येथील रहिवासी रुबिना खान आणि शेषकुमार अवस्थी यांच्यात अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते.
Accident | आरोग्य शिबिराहून परतताना डॉक्टरांच्या गाडीचा भीषण अपघात; २ जण जागीच ठार
रुबिना आणि शेषकुमार दोघेही भिन्न समाजातील असल्यामुळे त्यांच्या लग्नाला मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे दोघांनीही घरच्यांविरुद्ध जाऊन मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. हिंदू रितीरिवाजानुसार सात फेरे घेतल्यानंतर रुबीना खान रुबी अवस्थी बनली. यामुळे रुबीनाच्या कुटुंबीयांनी नाराज होऊन शेषकुमारवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले.
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांना धमकी देणारा चंद्रशेकर बावनकुळेंसोबत केक कापतोय; फोटो व्हायरल
कोर्टात हजर होताच रुबिना खान म्हणाली, ‘न्यायाधीश साहेब, मी प्रौढ आहे. मला माझा स्वतःचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी माझा धर्म सोडून हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे.’ रुबिना खानची ही गोष्ट ऐकल्यानंतर न्यायालय परिसरात काही क्षण शांतता पसरली.