दर्शना पवार (Darshana Pawar) या तरुणीच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्याला हादरून टाकले आहे. दर्शना पवार ही तब्बल पाच दिवस बेपत्ता होती यानंतर तिचा मृतदेह राजगड (Rajgad) किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला त्याचबरोबर तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे तिची हत्याच झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे. (Latest News)
आता याबाबत पोलीस यंत्रणा अजून तपास करत आहेत. तपासामध्ये अनेक नवनवीन माहिती देखील पोलिसांच्या हाती लागत आहे. दर्शना मित्रासोबत ट्रेकिंगला गेली होती. मात्र तो मित्र सध्या गायब आहे. पोलीस त्याचा सगळीकडे शोध घेत आहेत. आता या मित्राला शोधून त्यांच्याकडून त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
राहुल दत्तात्रय हांडोरे असं या मित्रच नाव आहे. दर्शना राहुलसोबत 12 जून रोजी ट्रेकिंगला गेली होती. मात्र ट्रेकिंगला गेल्यावर चार पाच दिवस झाले तरीदेखील माघारी परतली नाही. त्यानंतर दर्शनाच्या आईवडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह रायगडच्या पायथ्याशी सापडला. त्यानंतर तिचा मित्र राहुल देखील गायब झाला. त्यामुळे आता राहुलला शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे.
धक्कादायक! तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधला अन् लावलं कुत्र्यासारखं भुंकायला; कारण जाणून तुम्ही हादराल
दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. या पोस्टमार्टममध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. दर्शनाच्या अंगावर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर डोक्याला मार होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनाचा खूनच झाला असावा असा संशय पोलिसांना आला आहे.
मोठी बातमी! महिला आमदाराने अभियंत्याच्या लगावली थेट कानाखाली; व्हिडीओ व्हायरल