Amol Kolhe । “…त्यावेळी अमोल कोल्हे भेकडासारखे पळून गेले होते” अजित पवार गटाच्या नेत्याची टीका

Amol Kolhe

Amol Kolhe । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना थेट ओपन चॅलेंज दिल आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करणार आणि तो निवडूनच आणणार असा निर्धार अजित पवार यांनी बोलून दाखवला आहे. त्यानंतर अमोल कोल्हे आणि त्यांचा शिरूर मतदार संघ सातत्याने चर्चेत आहे. हे सर्व घडत असतानाच आता पुन्हा एकदा अजित पवार गटाकडून अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. (Hasan Mushrif On Amol Kolhe )

Jalgaon Accident News । भीषण अपघात! भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडले; शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधत एक जुना प्रसंग सांगितला आहे. ते म्हणाले, “अमोल कोल्हे काही दिवसांपूर्वी मला म्हणाले होते की, “माझ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मी राजकारण बंद करणार आहे आणि तेव्हाच ते भेकडासारखे पळून गेले होते”. असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याच्या सगळीकडे चर्चा सुरू आहेत.

Aditya Thackeray । बिग ब्रेकिंग! आदित्य ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का

त्याचबरोबर निवडणुकीसाठी अजित पवार गटातील नेत्यांना गाड्या देणार असल्याच्या बातम्या देखील मागच्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळा चर्चेत आहेत. त्यावर देखील मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “त्याचं मला काही माहित नाही. गाड्या कधी देणार कोण देणार? हे देखील मला माहिती नाही” असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

Ajit Pawar । ‘माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे’ – अजित पवार

Spread the love